Holi 2022 : कोरोनानंतर पुण्यात मोठ्या प्रमाणात धुळवड साजरी; तरुणांमध्ये उत्साह - Holi 2022 marathi news
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - तब्बल दोन वर्षानंतर पुण्यात तरुणाईने धुळवड साजरी केली आहे. कोरोनाच्या काळामध्ये अनेक निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांमध्ये धुळवड आणि इतर सण साजरे केले गेले नव्हते. मात्र, आता नियमांत आलेल्या शिथिलतेमुळे तरूणाईने मोठ्या प्रमाणावर धुळवड साजरी केली. याबाबत बोलताना तरुणाईने सांगितले की, दोन वर्षानंतर पुन्हा सण साजरा करताना अधिक आनंद होत आहे. तरी देखील आम्ही कोरोनाच्या नियमांचे काही प्रमाणात पालन करून हा सण साजरा करत आहोत. लवकरात लवकर कोरोना हद्दपार व्हावा आणि सगळ्या गोष्टी पुन्हा सुरळीत होतील, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST