अमेरिकेने 'WHO'चा निधी रोखला; काय म्हणतायेत आंतरराष्ट्रीय विषयांचे स्तंभलेखक निखिल श्रावगी... - निखिल श्रावघी पुणे लेटेस्ट बातमी
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) निधी थांबवण्याची घोषणा केली आहे. तसे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. डब्ल्यूएचओने वुहानमधील परिस्थिती गांभीर्याने हाताळली नसल्याचा आरोप अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे. अमेरिकेत आतापर्यंत २५,००० नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सुमारे ५ लाख ९४ हजार २०७ नागरिक कोरोना बाधित आहे. आंतरराष्ट्रीय विषयांचे स्तंभलेखक निखिल श्रावघी यांनी अमेरीकेच्या या घोषणेने मोठ्या राजकारणाला सुरूवात होणार असल्याचं म्हंटले आहे.
डब्ल्यूएचओला निधी देणाऱ्या राष्ट्रांमध्ये अमेरिकेचा मोठा वाटा आहे. अमेरिका दोन वर्षात 900 मिलियन डॉलर रक्कम टप्प्यांमध्ये देणार होती. मागासलेल्या राष्ट्रांमध्ये उद्भवणाऱ्या साथी, आणि आरोग्य यंत्रणेतील सुधारणा आणि बळकटीकरण तसेच जगभरात येणारे रोगांवरील लसीकरण, तसेच संशोधन यासाठी ही रक्कम देण्यात येते.
सध्या अमेरिकेत निवडणूका आहेत. अमेरिकेच्या आरोग्य खात्याने कोरोनाविषयी दिलेला इशारा गांभीर्याने न घेतल्याने कोरोनाचा फटका डोनाल्ड ट्रम्प यांना बसत असल्याचे लक्षात येताच ट्रम्प यांनी आरोग्य संघटनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यास सुरुवात झाली आहे, असे मत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक निखिल श्रावगी यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना मांडले आहे.