VIDEO : डरकाळी फोडून वाघोबाची पर्यटकांच्या दिशेने झेप - मध्य प्रदेश बांधवगड राष्ट्रीय उद्यानातील वाघ
🎬 Watch Now: Feature Video
भोपाळ - मध्य प्रदेशच्या बांधवगड राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांची वाघाच्या हल्ल्यातून सुटका झाली आहे. सफारीवर आलेले पर्यटक आपल्याला वाघ दिसावा या आशेत होते. तेवढ्यात झुडपात लपलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वाघ जोरात डरकाळी फोडून पर्यटकांच्या दिशेनं झेप घेत असताना पर्यटकांनी गाडी पळवली. यात विशेष म्हणजे, पर्यंटक वाघाला हड..हड असं ओरडताना पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.