VIDEO : शशी थरुरांनी हिंदीमध्ये व्यक्त केली अर्थसंकल्पावर नाराजी; पाहा व्हिडिओ.. - शशी थरुर अर्थसंकल्पीय अधिवेशन भाषण
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10574843-594-10574843-1612966297763.jpg)
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार शशी थरुर हे आपल्या इंग्रजीवरील प्रभुत्वासाठी ओळखले जातात. त्यांच्या इंग्रजीमधील एका वाक्याचा अर्थ लावण्यासाठीही भल्या भल्यांना शब्दकोष घेऊन बसावे लागते. मात्र, आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बोलताना, त्यांनी आपल्या भाषणात शुद्ध हिंदीचा वापर केला. त्यांनी प्रख्यात उर्दू कवी मिर्झा गालिब यांच्याही काही रचनांचा उल्लेख केला. शुद्ध हिंदीमध्ये अर्थसंकल्पावरील नाराजी व्यक्त करत ते म्हणाले, "हजारों ख्वाहिशे ऐसी, की हर ख्वाहिश पे दम निकले.. बहुत किया ऐतबार मोदीजी, अब तुम्हारी गली से हम निकले". त्यांच्या भाषणातील ठळक हिंदी पाहण्यासाठी हा व्हिडिओ पाहा...