उत्तराखंडची रिंगाल वनस्पती आहे प्लास्टिकला उत्तम पर्याय
🎬 Watch Now: Feature Video
आपल्या देशातील दुर्गम पर्वतांमध्ये अनेक अद्भूत नैसर्गिक देणग्या आहेत. मात्र, त्या अजुनपर्यंत जगासमोर आलेल्या नाहीत आणि संरक्षणाअभावी त्या नष्ट होत आहे. अशीच एक वस्तू म्हणजे रिंगाल. रिंगाल ही उत्तराखंडमध्ये आढळणारी विविधपयोगी वनस्पती. ही बांबूच्या कुटुंबातील प्रजाती असल्याचं म्हटलं जातं. उत्तराखंडमध्ये याला 'बौना बास' या नावानं ओळखलं जातं. रिंगाल वनस्पती समुद्रसपाटीपासून एक हजार ते सात हजार फूट उंच भागात आढळते. मात्र, ती बांबूसारखी उंच आणि लांब नसते. याची उंची 10 ते 12 फुटापर्यंत असते. तसेच बांबूच्या तुलनेत ही खूपच पातळ असते. जंगलात रिंगालची 300 पेक्षा जास्त झाडं आहेत. गेल्या दीड-दोन वर्षांपासून नियोजनबद्धरित्या त्यांची कापणी होत आहे. त्यानंतर या रिंगालपासून कारागीर टोपली, बादली, कुंडी, पेन स्टँड, फुलदाणी, चहाचा ट्रे, कचरापेटी, चटई आणि इतर अनेक वस्तू बनवतात. रिंगालपासून तयार केल्या जाणाऱ्या वस्तूला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी आहे. भविष्यात हे रिंगाल प्लास्टिकसाठी चांगला पर्याय ठरू शकतं, पाहुयात रिंगालचं महत्व सांगणारा हा खास रिपोर्ट...