संयुक्त किसान मोर्चाकडून आज 'भारत बंद', दिल्ली-गुरुग्राम रस्ता जाम
🎬 Watch Now: Feature Video
नई दिल्ली - संयुक्त किसान मोर्चाने आज भारत बंद पुकारला आहे. या बंदला राजकीय पक्षांसह अनेक संघटनांचा पाठिंबा आहे. या बंदचा परिणार मोठ्या प्रमाणात दिल्ली-गुरुग्राम बॉर्डरव दिसत आहे. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने या भागात मोठ्या प्रमाणात दिल्ली पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच, सुरक्षा दलातील जवानही या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीहून येणाऱ्या प्रत्येक गाडीची येथे कसून चौकशी केली जात आहे. यातील कोणत्या गाडीवर पोलिसांना संशय आला तर त्या गाडीची कसून चौकशी केली जात आहे. यासाठी येथे पोलिसांनी दुरपर्यंत बॅरिकेट्स लावले आहेत. त्यासोबतच बऱ्याच ठिकाणी क्रेन उभे केलेले आहेत. या आंदोलनाला दहा महिने उलटले आहेत. मात्र, सरकारने या शेतकऱ्यांच्या मागण्या काही मान्य केलेल्या नाहीत. किंवा त्यांच्याबाबत कोणताच ठोस निर्णय घेतला नाही. या पार्श्वभूमीवर हे सर्व शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. आता या बंदनंतर सरकार काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Last Updated : Sep 27, 2021, 1:08 PM IST