दिल्लीतील पिरागढी येथील आग लागलेली कंपनी कोसळतानाचा व्हिडिओ - building collapsed due to fire
🎬 Watch Now: Feature Video
दिल्लीत गुरुवारी पिरागढी भागातील ओकाया बॅटरी बनवण्याच्या कंपनीला आग लागली होती. आगीमुळे संपूर्ण इमारत कोसळली होती. ही इमारत कोसळतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. शेजारील कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने हा व्हिडिओ चित्रित केला आहे. आग विझवण्यास सहा तासांपेक्षा जास्त अवधी लागला होता. बचावकार्य करत असताना अग्निशामक दलाच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले आहेत.