लग्नानंतर नवरी स्वतःच गाडी चालवत पोहोचली सासरी, व्हिडिओ होतोय व्हायरल - Newlywed Kashmiri bride video
🎬 Watch Now: Feature Video
बारामुल्ला (काश्मीर) - सोशल मीडियावर एका काश्मिरी नववधूचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. काश्मिरी वधूने स्वत: महिंद्रा थार गाडी चालवत सासरी जाण्याचा निर्णय घेतला. लोकांना तिची ही हटके शैली खूप पसंद पडली आहे. दरम्यान, सना शबनम हिचा विवाह 22 ऑगस्ट रोजी बारामुल्ला जिल्ह्याच्या डेलिना येथील शेख आमिर याच्यासोबत झाला. लग्नानंतर सनाने जुन्या रीती परंपरांना फाटा देत स्वत:चा महिंद्रा थार गाडी चालवत सासरी जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा वर शेख आमिर याने देखील याकामी तिची साथ दिली आणि सनाने, महिद्रा थार चालवत सासरी ग्रँड एन्ट्री केली. नववधूचा व्हिडिओ नेटीझन्सला पसंद आला असून ते यावर लाईक, कमेंट करत आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत. अनेक जण हा व्हिडिओ शेअर करत आहेत.