NCP In Goa Assembly Election : गोव्यात राष्ट्रवादीचं ठरलं.. खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, 'अशा' प्रकारे लढविणार निवडणूक.. - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 14, 2022, 5:21 AM IST

गोंदिया : गोवा राज्यात होणारी विधानसभा निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP In Goa Assembly Election ) कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वबळावर लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल ( NCP Leader Praful Patel ) यांनी दिली. गोंदिया जिल्हात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ( Gondia Local Body Election 2022 ) प्रचाराच्या दरम्यान त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. याआधी उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या निवडणुकीत ( UP Assembly Election 2022 ) राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष समाजवादी पक्षासोबत युती करत लढणार असल्याचे ते म्हणाले. तर मणिपूर ( Manipur Assembly Election 2022 ) येथे कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष युती करून लढत आहेत. गोव्यात काही ठिकाणी शिवसेनेसह समविचारी पक्षासोबत युती करत लढणार असल्याची माहिती पटेल यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.