VIDEO: सायकली विकत घेऊन मजुरांचा भर उन्हात ६०० किलोमीटरचा प्रवास - स्थलांतरीत मजूर बातमी
🎬 Watch Now: Feature Video

छत्तीसगडमध्ये कारखान्यात काम करणारे स्थलांतरीत मजूर काम बंद झाल्याने सायकलवरून झारखंडला निघाले आहेत. काम बंद झाल्यानं ठेकेदाराने त्यांना पैसे द्यायचे बंद केले. त्यामुळे उपासमार होण्याची वेळ येण्यापेक्षा कामगार सायकलवर गावी निघाले आहेत. जवळ असणाऱ्या पैशातून त्यांनी सायकली विकत घेतल्या. जर रस्त्याने काही अडचण आली तर सायकल नीट करण्याचे सामानही त्यांनी बरोबर घेतले आहे. तब्बल ६०० किलोमीटरचे अंतर त्यांना कापायचे आहे. भर उन्हात सायकल चालवल्याने सर्वजण घामाने डबडबून जात आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वात जास्त हाल स्थलांतरीत मजुरांचे होत आहेत.