बैलाच्या जोरदार धडकेत युवकाचा मृत्यू, पाहा थरारक व्हिडिओ - बैल शर्यतीत माणसाचा मृत्यू
🎬 Watch Now: Feature Video
गदग (कर्नाटक) - बैलाच्या धडकेत एका युवकाला प्राण गमवावे लागले आहेत. कर्नाटक गदगच्या लक्ष्मेश्वर तालुक्यातील सूरानागी गावात बैलाच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. ही शर्यत 'खारा हुन्निमे' या उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती. तेव्हा या शर्यतीत एका बैलाने २२ वर्षीय किरण कुमार मलकजप्पा नेर्थी याला जोरदार धडक दिली. किरण कुमार याला यात गंभीर दुखापत झाली. तेव्हा त्याला हुबळी येथील केम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, किरण कुमार याचा मृत्यू झाला.