VIDEO हिमाचल प्रदेश दुर्घटना; किन्नौर येथील दरड कोसळल्याचे भयावह दृश्य - किन्नौर दरड दुर्घटना
🎬 Watch Now: Feature Video
शिमला - हिमाचल प्रदेशमधील किन्नौर येथे दरड कोसळण्याच्या घटनेत 50 हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना निगुलसारीच्याजवळ राष्ट्रीय महामार्गाजवळ घडली आहे. बसवर दरड कोसळल्याने प्रवासीही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. दरड कोसळण्याची दुर्घटना बुधवारी दुपारी घडली आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची ये-जा सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेत काही लोक बेपत्ता झाले आहेत. प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
Last Updated : Aug 11, 2021, 8:01 PM IST