दिल्लीवर विजय मिळवणारे महाराजा सूरजमल - महाराजा सूरजमल
🎬 Watch Now: Feature Video
हैदरबाद - इतिहासात राजस्थानच्या राजपूत जाट राजांनी आपली एक वेगळी छाप सोडलेली आहे. यात भरतपूरचे महाराजा सूरजमल यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. ज्या दिवशी औरंगजेबाचा मृत्यू झाला, त्याचं 13 फेब्रुवारी 1707 ला सूरजमल यांचा जन्म झाला. पिता बदन सिंह यांच्याकडून सूरजमल यांना 'वैर'ची जहागिरी मिळाली होती. 1733 मध्ये महाराजा सूरजमल यांनी सोगरियाच्या 'फतहगढी' वर विजय मिळवला. यानंतर त्यांनी 1743 मध्ये त्याच जागेवर भरतपूरचा पाया रचला अन् 1753 मध्ये तिथं येऊन राहू लागले. त्यांचा मुघलांमध्ये प्रचंड दरारा होता. त्यांनी 1763 मध्ये त्यांनी मुघलांच्या विरोधात दिल्लीवर आक्रमण केले.