VIDEO : बंगळुरूमध्ये पाडली 3 मजली जीर्ण इमारत - three-storey building in Bengaluru
🎬 Watch Now: Feature Video
बंगळुरू - शहरातील एक जीर्ण इमारत पाडण्यात आली आहे. जेसीबी आणि इतर मशीनद्वारे अर्ध्या तासात तीन मजली इमारत पाडण्यात आली. जीर्ण इमारतीत काल रात्रीपर्यंत वास्तव्यास असलेल्या रहिवाशांनी दु:ख व्यक्त केले. घरातील सामान घेण्याची परवानगी न देता इमारत पाडली असल्याचे त्यांनी म्हटलं. जीर्ण झालेली इमारत कधीही पडून कुणाच्या जीवीताला धोका निर्माण होवू नये यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.