छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागातील 'अर्जुन' - Mad Naxal-affected children archery training news
🎬 Watch Now: Feature Video

हैदराबाद - छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील 'माड' भागातील मुलांनी फक्त कोंडागाव जिल्ह्याच्याच नाही तर संपूर्ण राज्याचा गौरव वाढवला आहे. ITBP-41 बटालियनचे कमांडर सुरेंदर खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली 2016पासून माडमध्ये तीरंदाजी प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. जवान त्रिलोचन मोहंतो या मुलांना प्रशिक्षण देतात. राष्ट्रीय स्तरावर 75 मुलांनी तीरंदाजी केली आहे. त्यांनी 9 पदकं जिंकली आहेत. 178 मुलांनी राज्यस्तरावर तीरंदाजी केली त्यात त्यांनी 115 पदकं जिंकली आहेत.