इंटरनेटच्या आधुनिक युगात पत्रलेखनाची कमाल, 'ती'ने जगभरात जोडले 'पेन फ्रेंड' - पत्रलेखनाची ताकद बातमी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-9235730-thumbnail-3x2-penfriendv.jpg)
मलप्पुरम(केरळ) - आजच्या आधुनिक काळात मोबाईल आणि इंटरनेटचे माध्यम वेगवान संपर्कासाठी योग्य ठरत आहे. यात तुम्हाला कोणी पत्र लिहीण्यास सांगितल्यास आपण त्याकडे आश्चर्याने पाहू. केरळच्या मलप्पुरममधील सुब्बुलसुलाम उच्च माध्यमिक विद्यालयात ११ व्या वर्गात शिकणाऱ्या रेसबिनने पत्राद्वारे जगभरात अनेक मित्र जोडले आहेत. रेसबिनला पेपर क्राफ्टवर्क आणि डूडल्सची आवड आहे. तिने तयार केलेल्या कलाकृतींचे फोटो ती सोशल मिडीयावर टाकत असते. तिच्या अशाच एका पोस्टवर अमेरिकेतील साराने आवड दाखवत तिच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. रेसबिनने तिला तिचा पत्ता मागितला. यानंतर, काही महिन्यांनी रेसबिनने साराला एक पत्र प्राठवले. सारानेही याचे उत्तर पत्राद्वारे दिले आणि त्यांच्यात पत्रव्यवहाराला सुरुवात झाली. यानंतर रेसबिनने अमेरिकेसह जपान, ब्रिटन, इंडोनेशिया, स्पेनसारख्या इतर देशात पत्रांचे आदान-प्रदान सुरू केले. आज रेसबिनचे जगभरातील ४३ देशात जवळपास ४५ पेन फ्रेंड आहेत.