...अशी कामगिरी करणे भल्याभल्यांना जमत नाही, शेफालीने ते करून दाखवले! - India women's national cricket team
🎬 Watch Now: Feature Video
रोहतक (हरियाणा) : 'क्रिकेट हा फक्त मुलांचा खेळ आहे' या ओळी आपण अनेकदा ऐकल्या असतील, पण भारतीय महिला क्रिकेट टीममधील मुलींच्या कामगिरीमुळे या ओळी फिक्या पडायला लागल्या आहेत. यातीलच एक धडाकेबाज क्रिकेटर म्हणून पुढे आलेलं नाव म्हणजे 'शेफाली वर्मा'. रोहतक येथील शेफाली वर्मा ही क्रिकेटमधील तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. शेफालीने अवघ्या १५व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक ठोकलं. ती कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिच्या खेळाचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील 'फॅन' आहेत. इतकंच नव्हे तर, भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारी सर्वात युवा क्रिकेटपटू ठरली होती. हा विक्रम करताना तिने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा 30 वर्षे जुना विक्रम मोडला आहे.