लसीकरणाच्या भीतीने महिलेने जंगलात ठोकली धूम - Rajasthan News
🎬 Watch Now: Feature Video

चित्तौडगड - कोरोना या महामारीपासून वाचण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. याचे महत्व ओळखून सरकार हे लसीकरणावर विशेष लक्ष देत आहे. परंतु ग्रामीण भागात याबाबत मोठ्या प्रमाणात भीती पाहायला मिळत आहे. येथील ग्रामीण भागात लावलेल्या विशेष लसीकरण कॅम्पकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे.
ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अद्याप मोठ्या प्रमाणात जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे. तर चित्तौडगड येथे एका गावातील वयोवृद्ध महिलेला लसीकरणाबाबत बोलण्यात आले. त्यावेळी ती थेट जंगलात पळून गेल्याची घटना घडली आहे. दरम्यान तिच्या मृत्यूची अफवा ही गावात होऊ लागली. मात्र सरपंच यांनी गावकऱ्यासह जंगलात भेट दिली यावेळी महिला जिवतं असलेल्याचे कळते. यावेळी अस्थावस्थ अवस्थेत पडलेल्या महिला मला लसीकरण नाही करायचे अशी हात जोडून विनंती करू लागली. यावेळी ती म्हणाली की, मला लसीकरण करायचे नाही आहे. लसीकरणाने मी मरेल. खूप वेळ समजूत काढल्यानंतर तीला बाहेर काढण्यात आले.