वाघिणीच्या मृत्यूनंतर वाघ घेतोय बछड्यांची काळजी; पाहा व्हिडिओ.. - PTR में शावकों की देखभाल करता बाघ
🎬 Watch Now: Feature Video
भोपाळ : मध्य प्रदेशच्या पन्ना व्याघ्र प्रकल्पात एक अनोखे दृश्य पहायला मिळत आहे. एका वाघिणीच्या मृत्यूनंतर तिच्या बछड्यांची काळजी ही एक वाघ घेत असल्याचे दिसून येत आहे. साधारणपणे नर वाघापासून बछड्यांना धोका असतो. जंगलामध्ये नर वाघ बछड्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. मात्र, याठिकाणचे हे दृश्य पाहून प्राणीतज्ज्ञही आश्चर्यात पडले आहेत. हा वाघ अशीच यांची काळजी घेत राहिला, तर त्या बछड्यांना दुसरीकडे नेण्याची गरज नाही असे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या वाघाचा आणि त्याच्या बछड्यांचा व्हिडिओ पन्ना प्रकल्पाने शेअर केला आहे...