भयावह! गाडी आली आणि शेतकऱ्यांना चिरडून गेली, व्हिडीओ व्हायरल - lakhimpur violence
🎬 Watch Now: Feature Video
उत्तर प्रदेश - लखीमपूर हिंसाचारानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यानचा आहे. या व्हिडीओमध्ये मागून येणारे वाहन रस्त्यावर चालणाऱ्या शेतकऱ्यांना अंगावर चढवल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हा व्हिडिओ जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा व्हिडिओ बघावा आणि लखीमपूर खिरीला भेट द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काँग्रेस नेते आणि मिर्झापूरचे माजी आमदार ललितेश पती त्रिपाठी यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. ज्यांना लखीमपूर शेतकरी हत्याकांडाचे पुरावे हवे आहेत, त्यांनी पुरावे घ्या. फक्त या रक्तरंजित गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा, असे त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. मात्र, ईटीव्ही भारत या व्हिडीओची पुष्टी करत नाही.
Last Updated : Oct 5, 2021, 3:06 PM IST