VIDEO : हरयाणा-दिल्ली मार्गावरील टोलनाके आंदोलकांनी पाडले बंद
🎬 Watch Now: Feature Video
सोनीपत - शेतकरी आंदोलनाचा आज १७ वा दिवस आहे. शेतकरी हरयाणा आणि पंजाबातील टोलनाके खुले करत आहेत. सोनीपत महामार्गावरील भिगान येथील टोलनाका आंदोलकांनी खुला केला. यासोबत इतर अनेक टोलनाक्यांकडे आंदोलकांनी मोर्चा वळवला आहे. ट्रॅक्टरमधून हजारो शेतकरी अजूनही दिल्लीकडे कूच करत आहेत. १४ तारखेला शेतकरी नेते सिंघू सीमेवर उपोषण करणार आहेत. टोल नाक्यावरून गाड्या पैसे न घेताच सोडण्यात येत आहेत. मात्र, गाड्यांवरील फास्ट टॅगमुळे पैसे बँक खात्यातून कट होत असल्याचे प्रवासी म्हणत आहेत.