जेंडर डिस्फोरिया : पाहा 'दीपक'चा 'दीपिका' होण्यापर्यंतचा प्रवास... - लिंग परिवर्तन बातमी
🎬 Watch Now: Feature Video
जोधपूर (राजस्थान) : 'जेंडर चेंज' किंवा 'लिंग बदल' हा विषय थोडा किचकट आणि सर्वसामान्यांच्या मनात धसका निर्माण करणारा आहे. याबाबत आपल्या देशात आजही अनेकजण बोलायचं टाळतात. किंवा एखाद्याने हा विषय काढताच अनेकांच्या मनात प्रश्नांचं काहुर माजायला लागतं. आपल्या देशातील अनेक गोष्टींचा भडिमार या विषयावर अनेकांना बोलू देत नाही. मात्र, आजची तरुण पिढी ही काहीतरी नवीन करण्याच्या इच्छेपोटी जेंडर चेंज करण्याचं धाडसही पत्करायला तयार आहे. जोधपूरमध्ये अनेक वर्षांपासून राहणाऱ्या दीपक मारवाडी नामक तरुणानेही शस्त्रक्रियेद्वारे लिंग परिवर्तन केले. आता तो दीपकपासून दीपिका मारवाडी झाला आहे. सध्या येथील स्थानिकांमध्ये दीपकचा दीपिकापर्यंतचा प्रवास चर्चेचा विषय बनला आहे.
Last Updated : Sep 5, 2020, 7:57 AM IST