एका दुःस्वप्नाप्रमाणेच आहे बोनाकोड चहा मळ्यांमधील कामगारांचे आयुष्य...
🎬 Watch Now: Feature Video
तिरुवअनंतपुरम : केरळमध्ये अगस्त्य पर्वत रांगांमध्ये असलेलं बोनाकोड नावाचं खोरं पर्यटकांसाठी नेहमी स्वर्गासारखं राहिलं आहे. या ठिकाणाला भेट देणारे पर्यटक इथले नयनरम्य घाट आणि पर्वत पाहून खुश होतात. निसर्गाची अप्रतिम देणगी मिळालेल्या बोनाकोडची खरी परिस्थिती मात्र अतिशय विपरित आहे. २००१मध्ये महावीर समूहाने हे मळे सोडल्यापासून इथल्या मजुरांची अवस्था दयनीय झाली आहे. ३०० पेक्षा अधिक मजूर आणि त्यांचे कुटुंबीय बेरोजगार झाले आहेत. कोणत्याही मदतीशिवाय, आहे त्या परिस्थितीत त्यांना सोडून दिलं गेलं. तेव्हापासून ते उपासमारीशी झगडत हलाखीचे जीवन जगत आहेत...