ओडिशात होतेय काळा गहू अन् काळ्या हळदीची शेती!
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - बाजारात उपलब्ध असलेली हळद आणि गहू साधारणपणे पिवळ्या रंगाचे असतात. मात्र, पश्चिम ओडिशातील संबळपूरमधील उच्च शिक्षित आणि तरुण शेतकरी 'दिब्यराज बेरीहा' यांनी काळी हळद आणि काळा गहू यांचे उत्पादन घेतले आहे. साध्या गव्हाच्या तुलनेत काळा गहू जास्त पौष्टिक आहे. या गव्हाचा आहारात समावेश केला, तर मानसिक तणाव, लठ्ठपणाशी संबधित आजार, कर्करोग, मधुमेह आणि हृदयरोगासारख्या अनेक आजारांशी लढण्याची ताकद शरीराला मिळते. काळी हळद पिवळ्या हळदीपेक्षा एकदम वेगळी आहे. काळ्या हळदीत मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आढळतात. कॅन्सरसारख्या घातक आजारांवर ही हळद उपयुक्त आहे. यात असलेल्या अँटिऑक्सिडन्टमुळे ताप, सांधेदुखी, त्वचा रोग आणि अस्थमा असलेल्या व्यक्तींना फायदा होतो.