टाकाऊ वस्तूंपासून बनवली सुंदर बाग; कोरोनाकाळात दोन बहिणींचा उपक्रम - टाकाऊ वस्तूंपासून सुंदर बाग
🎬 Watch Now: Feature Video
ही कोणत्या फुलांची नर्सरी नाही. तर, घरातील बाग आहे. आणि या फुलांचा जो सुगंध दरवळतोय. तो या दोन बहिणींच्या कष्टाचा आहे. या फुलांचे रंग हे त्या दोघींच्या मेहनतीचे आहेत. ही नर्सरी तयार करण्यासाठी सगळ्या टाकाऊ वस्तुंचा वापर करण्यात आला आहे. टाकाऊ वस्तुंपासून तयार केलेल्या काही कुंड्यांमध्ये फुलंही लावण्यात आली आहेत. एकाच कुंडीत तीन प्रकारची फुलं लावण्यात आली आहेत. या दोघी बहिणींना कोरोनाची लागण झाली होती. त्या क्वारंटाईन असताना त्यांनी आपला रिकामा वेळ ही बाग तयार करण्यात सत्कारर्णी लावला आहे.