कचऱ्यापासून बनवल्या कुंड्या; टाकाऊ वस्तूंपासून बनवली सुंदर बाग - garden made from waste materials
🎬 Watch Now: Feature Video
टाकाऊ वस्तूंपासून कुंडी बनवून सुंदर अशी बाग साकारता येऊ शकते. याचे उत्तम उदाहरण चंदीगडच्या सेक्टर 16 रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी सपना चौधरी यांनी मांडलयं. आपल्या घरात त्यांनी एक अनोखी बाग बनविली आहे. या बागेत वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. यात विशेष म्हणजे झाडे लावण्यासाठीच्या कुंड्या स्वता: सपना यांनी तयार केल्या आहेत. सुरवातीला प्राण्यांचा आकार देऊन एक ते दोन कुंड्या तयार केल्या आणि रोपटे लावले. या कुंड्यांना पाहून परिसरातील लहान मुले आकर्षित झाली. या कुंड्या एकदम वेगळ्या आहेत. बाजारात या मिळत नाहीत. बगीचा पाहण्यासाठी मुले दररोज येतात. खास गोष्ट म्हणजे या सर्व कुंड्या घरातील कचऱयापासून बनवल्या आहेत. या कुंड्यांना वेगवेगळ्या प्राण्यांचे स्वरूप दिलयं. हा सुंदर बगीचा तयार करण्यासाठी सपना यांना 8 महिन्यांचा कालावधी लागलाय. घरातील प्लास्टिकच्या बाटल्या व बॉक्सचा वापर करून त्यांनी कुंड्या तयार केल्या. रिकाम्या बाटल्या आणि कॅनमधून वेगवेगळ्या प्राण्यांचा कलाकृती बनवल्या आणि त्यांना सुंदर रंगांनी सजवल आहे. सपना यांनी या अनोख्या कुंड्यामध्ये निरनिराळ्या प्रकारची झाडे लावली आहे. तसेच त्यांनी भिंतीही रंगवल्याने बागेच्या सौंदर्यात भर पडली आहे.