घराच्या शोधात असलेली आसाममधील अनाथ बिबट्यांची बछडे
🎬 Watch Now: Feature Video
कुठल्याही बाळासाठी आपल्या आईविना राहणे कठीण असते. मग ते बाळ मणुष्याचे असो किंवा एखाद्या प्राण्याचे. आसाममधील काही नागरिकांनी २०१४-१५ मध्ये बिबट्याच्या चार बछड्यांना वाचवले होते. त्यांनी ही बछडी वन्यजीव संरक्षण आणि पुर्नवसन विभागाला सोपवली. तेव्हापासून ही बछडी आईविना राहत आहेत. गेल्या सहा वर्षांच्या काळात ही बछडी मोठी तर झाली मात्र, ते स्वबळावर शिकार करू शकत नाहीत. आपल्या आईच्या हातून संगोपन अन् शिकारीचे प्रशिक्षण न मिळाल्याने या बछड्यांची ही अवस्था झाली आहे. बिबट्याकडे शिकार करण्याची मुलभूत कला असते. या बछड्यांकडे नेमका तोच गुण नाही. त्यामुळे त्यांना जंगलात सोडणे शक्य नाही. वन्यजीव अधिकाऱ्यांना मोठ्या होणाऱ्या या बछड्यांची चिंता वाटत आहे.