ग्रीन मॅन ऑफ लुधियाना : पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आयआरएस अधिकाऱ्याने घेतला पुढाकार - ग्रीन मॅन ऑफ लुधियाना
🎬 Watch Now: Feature Video
लुधियाना (पंजाब) - लुधियानाचे रोहित मेहरा हे 'ग्रीन मॅन' नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांना हे नाव त्यांच्या पर्यावरणासाठी केलेल्या कार्याबद्दल देण्यात आले. त्यांनी देशभरात 75 हुन अधिक ग्रीन बेल्ट विकसित केले आहेत. त्यांच्याद्वारे विकसित केलेल्या ग्रीन बेल्टमध्ये 600 ते 700 झाडं आहेत. या माध्यमातून त्यांनी देशाच्या आतापर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात 8 लाखांहून अधिक झाडं लावली आहेत. ते लुधियानामध्ये कर विभागत सहसंचालक पदावर कार्यरत आहेत. गेल्या ४ वर्षांपासून आपल्या क्षमतेनुसार ते वृक्षारोपण मोहीम राबवत आहेत. पंजाबच्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी एक ग्रीन बेल्ट विकसित केला आहे. सोबतच सूरत, बडोदा, मुंबई आणि दिल्लीसह भारतातील इतर अनेक शहरांमध्येही त्यांनी मिनी जंगलाच्या रुपाने आपली हिरवी छाप सोडली आहे.