हजारीबागचा 'इंजिनिअर' शेतकरी! - इंजिनिअर अमरनाथ दास शेती न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-9961608-thumbnail-3x2-house.jpg)
हैदराबाद - सध्याच्या स्पर्धेच्या युगात चांगली नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. अशा परिस्थितीत एखाद्या तरुण इंजिनिअरने चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती सुरू केली तर, लोक त्याला नक्कीच वेडा म्हणतील. हजारीबागच्या अमरनाथ दास यांनी बीआयटी मेसरातून सिव्हील इंजिनिअरींग केले. त्यानंतर त्यांनी 14 वर्ष एका मोठ्या कंपनीत नोकरही केली. मात्र, मातीशी असलेल्या घट्ट नात्यामुळे शेवटी त्यांची गावात जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गावातील शेतकऱयांना मदत करण्यासाठी 'सॉईल लेस टेक्नोलॉजीचा वापर असलेले पॉलीहाऊस सुरू केले आहे.