आशिया खंडातील सर्वात मोठी मानवनिर्मित 'जंगल सफारी', एकदा बघाच - raipur jungle safari news

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 16, 2020, 8:54 PM IST

रायपूर (छत्तीसगड) : रायपूर रेल्वे स्थानकापासून सुमारे 35 किमी अंतरावर आणि स्वामी विवेकानंद विमानतळ रायपूरपासून 15 किमी अंतरावर या जंगलसफारीची स्थापना करण्यात आली आहे. ही आशिया खंडातील सर्वात मोठी मनुष्यनिर्मित जंगल सफारी आहे. सन 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी या भेटीदरम्यान येथील वाघाची छायाचित्रदेखील काढले होते. तर, वाघांना कॅमेऱ्यात बंदिस्त करतानाचा त्यांचा फोटो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय ठरला होता. 800 एकरात पसरलेल्या या जंगलात सिंह, वाघ, अस्वलांसोबतच इतर वन्यप्राणी आहेत.या जंगलात हर्बीवोर सफारी, बियर सफारी, टाइगर सफारी आणि लॉयन सफारी अशा एकूण चार सफारी आहेत. तसचे तृणभक्षी प्राण्यांच्या अधिवासानुसार मोठ्या प्रमाणात अंजनाची झाडे लावून त्याला घनदाट बनवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.