Big Bull : अबब... तब्बल एक कोटीला विकला गेला बैल, जाणूघ्या काय आहे खासियत..? - bull
🎬 Watch Now: Feature Video
बंगळुरु - कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये 11 नोव्हेंबर रोजी चार दिवसीय कृषी मेळाव्याचे ( bangalore farmers exhibition ) आयोजन करण्यात आले होते. आज शेवटच्या दिवशी (दि. 15 नोव्हेंबर) कृष्णा नावाच्या बैलाचीच चर्चा होती. कारण या बैलाची बोली एक दोन लाख नाही तर तब्बल एक कोटी लागली. एका व्यक्तीने हा बैल एक कोटी रुपयांत खरेदी केला आहे. बैलाचे मालक बोरगौडा म्हणाले, हा हल्लीकर जातीचा बैल आहे. बैलांची ही जात नामशेष होत चालली आहे. कृष्णा या बैलाचे वय साडेतीन वर्षे असूनही त्याने किंमतीच्या बाबतीत त्याच्यापेक्षा मोठ्या बैलांना मागे सोडले. या बैलाच्या स्पर्मच्या म्हणजेच शुक्राणूच्या एका डोसची किंमत एक हजार रुपये आहे. केवळ साडेतीन वर्षाच्या बैलाला इतकी मोठी बोली लागल्याने मालक बोरगौडा तर खुष आहेतच पण, याची चर्चा सर्वत्र होत आहे.
Last Updated : Nov 15, 2021, 5:15 PM IST