Builder Sanjay Biyani Murder Case : नांदेडच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना - अशोक चव्हाण - Builder Sanjay Biyani Murder Case

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 6, 2022, 7:07 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

नांदेड: नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर ( Builder Sanjay Biyani murdered ), आज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ( Public Works Minister Ashok Chavan ) यांनी बियाणी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्याचबरोबर बियाणी कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले. यावेळी बोलताना नांदेडच्या कायदा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. सूत्रधार कोणीही असो पकडल्या शिवाय राहणार नाही - नांदेडच्या इतिहासात या अगोदर असं कधी घडलं नाही. बारकाईने तपास सुरू आहे. सूत्रधार कोणीही असो, सुत्रधार आणि मुख्य आरोपीला पकडल्याशिवाय राहणार नाही, असं चव्हाण म्हणाले. अंत्यविधी झाल्यानंतर आपण पोलीस अधिकाऱ्यांची बैठक ( Meeting of police officers ) घेऊन तपासाबाबत आढावा घेणार आहे. तसेच बियाणी कुटुंबाच्या इच्छेनुसार तपास केला जाईल, असे ही अशोक चव्हाण म्हणाले. हेही वाचा - Sanjay Biyani Murder Case : संजय बियाणी हत्याकांडातील 'हुकमी एक्क्याला' अटक करा : पत्नीने फोडला टाहो
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.