VIDEO : कोरोनात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीसाठी पुणे विद्यापाठात आंदोलन - Student Helping Hand Pune University
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - कोरोनामुळे पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ व्हावे, म्हणून स्टुडंट हेल्पिंग हँडच्यावतीने ( Student Helping Hand ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ( Savitribai Phule Pune University ) आंदोलन करण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाईंच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे. ( Agitation in Pune University ) “विद्यापीठाने ५०७ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क आणि एक हजार १३८ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ झाल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्ष त्यांच्याकडे यांची यादी आणि माहिती उपलब्ध नाही. मुळातच या संदर्भात राज्य सरकारकडेच माहिती नव्हती. लक्षवेधी म्हणून हा प्रश्न विधानपरिषदेत विचारला होता. परंतु त्याची माहिती अद्यापही त्यांच्याकडे नाही. अशावेळी विद्यापीठाकडे ही आकडेवारी कोठून आली." या संबंधीचा जाब विचारण्याबरोबरच या निर्णयाच्या तत्काळ अंमलबजावणीसाठी उपोषण करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी सांगितलं. याविरोधात सत्याग्रह मार्गाने स्टुडंट हेल्पिंग हँडच्यावतीने आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST