Wild Tusker Attack on Bus : हत्तीचा धावत्या बसवर हल्ला; प्रसंगावधानाने चालकाचे वाचले प्राण
🎬 Watch Now: Feature Video
तिरुवनंतपुरम - केरळ रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या बस ( Kerala Road Transport Corporation bus )चालकाची हत्तीच्या आक्रपणापासून थोडक्यात सुटका झाली आहे. मुन्नार-उदुमलपेट महामार्गावरून ( Munnar Udumalpet highway ) जात असताना ही घटना घडली आहे. बुधवारी मुन्नार डीवायएसपी कार्यालयाजवळ हत्तीने थेट बसच्या दिशेने थाव घेतली. या प्रकारच्या आक्रमक हत्तींना केरळमध्ये स्थानिक लोक 'पडयप्पा' म्हणतात. हा हत्ती रस्त्याच्या मधोमध उभा होता. बस थांबताच हत्तीच्या दिशेने चालत आला. हस्तीदंताने बसला धक्का दिल्याने बसच्या समोरील विंडशील्डचे नुकसान झाले. हे दृश्य घाबरविणारे आहे. अशावेळी बसच्या ड्रायव्हरने कमालीची मानसिक ताकद आणि धैर्य दाखविले. हत्तीने आक्रमक होऊनही कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे ( driver avoided any provocation ) टाळले. ड्रायव्हर बाबुराज हे शांतपणे त्याच्या सीटवर बसून राहिले. काहीवेळानंतर पदयाप्पा ( Padayappa attack on Kerala bus ) रस्त्याच्या कडेला गेला. हे दिसताच ड्रायव्हर वेगाने घटनास्थळावरून बस वेगाने नेली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST