Paid Home Tax by Coins : जळगावातील एका रहिवाशाने चिल्लर देऊन केली जमा घरपट्टी - मार्च एंडिंग
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव - मागील व चालू वर्षाची आपल्या घरावर असलेली घरपट्टी मार्च एंडिंगच्या आधी भरण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिल्यानंतर आज (दि. 24 मार्च) महापालिकेच्या घरपट्टी विभागात चक्क एका नागरिकाने पोत्यात भरून 12 हजार 278 रुपयांपैकी तब्बल 10 हजार रुपयांची चिल्लर घेऊन आपली घरपट्टी जमा केली. यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना चिल्लर मोजताना घाम फुटल्याचे दिसून आले. जळगाव शहरातील रहिवासी असलेले मोहन तिवारी यांच्या घरावर मागील दोन वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी बाकी होती. ती भरण्यासाठी महापालिकेच्या वसुली विभागातर्फे वारंवार तगादा लावण्यात आला होता. मार्च एंडिंगच्या आधी आपल्या घरावर असलेली थकबाकी जमा करण्यासाठी मोहन तिवारी यांनी आज महापालिकेच्या वसुली विभागात येऊन चिल्लर घेऊन आपल्या घरावर असलेली दोन्ही वर्षाची थकबाकी जमा केली आहे. ही चिल्लर मोजताना महापालिकेच्या वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांची दमछाक उडाली. यावेळी महापालिकेत नागरिकांनी इतक्या मोठ्या स्वरूपात चिल्लर जमा केल्याने एक वेगळीच चर्चा रंगली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST