रमजान निमित्ताने शहरातील विविध ठिकाणी बाजारपेठ फुलली, मोमीनपुरा येथील आढावा - खजूर
🎬 Watch Now: Feature Video
पुणे- रमजान ( Ramzan ) महिन्याला सुरुवात झाली आहे. तब्बल दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त रमजान साजरा होत असल्याने शहरातील गुरुवार पेठ येथील मोमीनपुरा कॅम्प, कोंढवा, नाना पेठ अशा विविध ठिकाणी येथे खाद्यपदार्थांच्या दुकाने सजू लागली आहे. विविध वस्तू व खाद्यपदार्थ घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मागील अनेक वर्षांपासून मोमीनपुरा येथे रमजान निमित्ताने छोटी मोठी अशी 150 ते 200 दुकाने लागतात. आजपासून रमजान महिन्याला सुरुवात झाल्याने टोप्या, खजूर, सरबत, विविध खाद्यपदार्थ, चहा तसेच उपवास सोडण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंची दुकाने लागायला सुरुवात झाली आहे. पुण्यातील सर्वात मोठी मशीद मक्का मशीदमध्येही रमजान महिन्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST