Sugarcane Farmers Trouble In Niphad : मुकादमांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक; ऊसाला तोडच मिळेना - Sugarcane Farmers Trouble In Niphad
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक (निफाड) - निफाड तालुक्यात ऊस तोडणीसाठी कारखान्यांसह काही मुकादमांकडून विलंब होत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. याचबरोबर मुकादमांच्या टोळ्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. (Sugarcane Farmers Trouble In Niphad) निफाड तालुक्यातील कादवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ऊस अजून शेतात जसाच्या तसा उभा आहे. यामध्ये सर्वत्रच ऊसाला मोठ्या प्रमाणात तुरा आल्यामुळे ऊसाच्या भावात पुन्हा कमी-जास्त भाव होऊ शेकतो असे वाटत आहे. मुकादम मनमानी करून ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी करीत असल्याने निफाड तालुक्यातील जवळपास दोन लाख टनपेक्षा तोडणी योग्य ऊस शेतात उभा आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST