Video : नियंत्रण सुटल्याने चारचाकीने तीन दुचाकींना उडवले, दुचाकीस्वाराचा मृत्यू - rams on to three bikes
🎬 Watch Now: Feature Video
वायनाड (केरळ) - येथेल पनारामम येथे एका चारचाकीचे नियंत्रण सुटले आणि तीन दुचाकींवर धडकली. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी (दि. 6 जून) घडला आहे. चारचाकी एका भिंतीवर आदळली आणि थांबण्यापूर्वी दुसऱ्या दुचाकीला धडकली. चारचाकीतील चालक आणि प्रवासीही जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारचाकी वाहन कोंडोट्टीहून मानंतवाडीच्या दिशेने जात असताना तिचे नियंत्रण सुटले आणि ती दुचाकीवर आदळली. कारने प्रथम धडकलेल्या सुनीलला तातडीने मेपाडी येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST