Patrachal Land Scam : कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरण; लवकरात लवकर भाडे देण्याची रहिवाशांची मागणी - 1034 कोटींना विकल्याचा आरोप
🎬 Watch Now: Feature Video
गोरेगाव / मुंबई : पत्राचाळ जमीन घोटाळा 2007 ( Patrachal Land Scam ) मध्ये सुरू झाला. हा घोटाळा ( Patrachal Land Scam ) महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरण (म्हाडा), प्रवीण राऊत, गुरुआशिष कन्स्ट्रक्शन अँड हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) यांच्या संगनमताने झाल्याचा आरोप आहे. पत्राचाळमध्ये 500 हून अधिक कुटुंबे राहत होती. या जमिनीवर सदनिका बांधून तेथे राहणाऱ्या लोकांना देण्यात येणार होत्या. यासाठी गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी (GACPL) सोबत करार करण्यात आला. या कंपनीसोबत झालेल्या करारानुसार या भूखंडावर तीन हजार सदनिका बांधण्यात येणार होत्या. येथे फ्लॅट बनवणाऱ्या कंपनीला जमीन विकण्याचा अधिकार नव्हता. परंतु, कंपनीने कराराचे उल्लंघन करून ही जमीन नऊ वेगवेगळ्या बिल्डरांना 1,034 कोटींना विकल्याचा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयाने १७ वर्षात १००० कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अनेकांना अटक केली आहे. ज्यामध्ये बिल्डरचा सहभाग आहे. आता या संपूर्ण प्रकरणाबाबत संजय राऊत यांनाही अटक करण्यात आली आहे. राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, अनेक वर्षांपासून येथे राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या म्हणजे त्यांना ना घराचे भाडे मिळाले आहे, ना अनेक वर्षांपासून घर मिळाले आहे. सर्व रहिवाशांना रस्त्यावरच राहावे लागले आहे. काहीजण ऑटो चालवून, घराचे भाडे भरून पोट भरत आहेत. तर काही इतर छोटीमोठी कामे करून घराचे भाडे भरत आहेत. अशा स्थितीत त्यांना लवकरात लवकर त्यांचे भाडे देण्यात यावे आणि यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी आता या लोकांकडून होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST