राऊत म्हणाले आमदारांच्या कुटुंबियांना सुरक्षा नसते, राणा यांची राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी - आमदारांच्या कुटुंबियांना सुरक्षा नसते
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15654191-thumbnail-3x2-news.jpg)
मुंबई - आमदारांना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, त्यांच्या कुटुंबियांना नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी केले होते. शिवसैनिक केवळ आदेशाची वाट पाहत आहेत. त्यांचा संयम तुटला तर महाराष्ट्र पेटेल, पण आम्ही त्यांना सावरत आहोत, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) म्हणाल्या, ज्या पद्धतीने राऊत यांनी आमदारांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारची नाही, असे म्हणाले. यावरुन गुवाहाटीत असलेल्या आमदारांच्या कुटुंबियांना धोका असल्याचा अंदाज येतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सुरक्षेसाठी विनंती करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी ( Presidential Rule ) मागणीही राणा यांनी केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST