Eid-Ul-Fitr : अमन और शांती दे! प्रसिद्ध जामा मशिदीत सामुहिक नमाज पठन
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - दोन वर्षानंतर दिल्लीतील प्रसिद्ध जामा मशिदीत सामुहिक नमाज पठन करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने मुस्लीम अनुयायी जमले होते. नमाज पठन करून एकमेकांची गळाभेट घेण्यात आली. लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांची एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर लहान मुलांना ईदी भेट देण्यात आली. यंदा शासनाने नियमावलीत शिथीलता आणल्याने यंदाची ईद ही मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. गेला महिनाभर मुस्लिम बांधव रमजान महिन्याचे कडक उपवास करीत होते. पहाटे सहेरी करून सूर्यास्तानंतर इफ्तारी करत दिवसभराचा निर्जल उपवास सोडला जात होता. त्याशिवाय विशेष नमाज पठण केली जात होती. कुराणाचे देखील पठण करीत अल्लाहाचे नामस्मरण करून सुख, शांती बरोबर आयुष्यात येणारी संकटे दूर करण्याची दुआ मागण्यात आली. मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्याचा चंद्र काल दिसला. तर आज देशभरात रमजान ईद म्हणजे ईद उल फितर साजरी ( Eid-ul-Fitr 2022 ) होत आहे. सोमवारी महिन्याचा शेवटचा तिसावा उपवास ( रोजा ) करण्यात आला असून, आज देशभरात रमजान ईद उत्साहात साजरी होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST