Eknath Shinde : 'जगामध्ये भव्य दिव्य स्मारक लवकरात लवकर तयार व्हाव' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Chief Minister Eknath Shinde said
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,( Chief Minister Eknath Shinde ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी विविध स्मारकांच्या कामाचा पाहणी आढावा घेण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. आज दिवसभरात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ( Doctor Babasaheb Ambedkar Memorial ), बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक ( Balasaheb Thackeray National Memorial ) यांच्या कामाचा आढावा घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या आढावा घेतल्यानंतर त्यांनी एक छोटी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमाची संवाद साधला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST