Praveen Darekar Aggressive In LC : दरेकर भडकले! उपसभापतींवर केला पक्षपातीपणाचा आरोप - Praveen Darekar Aggressive

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 24, 2022, 1:43 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

मुंबई - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण देरेकर विधान परिषदेच्या उप सभापती निलम गोरे यांच्यावर चांगलेच भडकले. आमच्याशी तुम्ही पक्षपातीपणे वागत असून आम्हाला तुम्ही बोलण्यासाठी वेळ देत नाहीत असा थेट आरोप दरेकर यांनी विधान परिषदेत बोलताना केला. (Praveen Darekar Aggressive Against Deputy Speakers) आमचे सदस्य आज बोलायला मिळाले नाही म्हणून नाराज आहेत असे म्हणत तुम्ही त्यांनी उप सभापतींवर राग व्यक्त केला. दरम्यान, दरेकर यांनी अचानक रौद्र रुप धारण केल्याने उप सभापती निलम गोऱ्हे यावर काहीही बोलल्या नाहीत. (Deputy Speakers Neelam Gorhe) परंतु, दरेकर या अगोदर आम्ही एकदा अविश्वास ठराव आणला होता. आणि असे होणार असेल आम्ही पुन्हा आणू असे म्हणाले तेव्हा उप सभापती म्हणाल्या तुम्ही मला धमक्या देऊ नका. यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मध्यस्थी करून देरेकर यांचे शब्द कामकाजातून काढून टाकण्याची विनंती केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.