CM Charanjit Channi : बकरीचे दूध काढण्यासाठी सीएम चन्नी यांनी थांबविला वाहनाचा ताफा, व्हिडिओ झाला व्हायरल - मुख्यमंत्री चरणजीत सिंग भदौर भेट
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14682059-thumbnail-3x2-asd.jpg)
अमृतसर -मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हे भदौरमधून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, मंगळवारी प्रदीर्घ कालावधीनंतर ते भदौर विधानसभेत पोहोचले, तेथे त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह तेथील जनतेचीही भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री चन्नी यांनी शेळीचे दूधही काढले. त्यांचा ताफा भदौरच्या बाळो गावातून जात असताना वाटेत शेळ्या चरताना पाहून त्यांनी ताफा थांबवला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेळीचे दूध काढण्याची इच्छा व्यक्त केली, त्यानंतर त्यांनी दोन्ही हातांनी बकरीचे दूध काढले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सीएम चन्नी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST