Girish Mahajan Taken Nap in Session : माजी मंत्र्यांना विधानसभेत लागली डुलकी, शेलारांनी खुणावताच...पाहा VIDEO - BJP MLA Sleep in Assembly
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - शाळेच्या वर्गात शेवटच्या बाकावरील विद्यार्थी, अथवा एखाद्या बौद्धिक वर्गात सहभागी झालेला प्रेक्षक, अगदी राजकीय व्यासपीठावर उपस्थित असलेला नेता अनेकदा आपल्याला डुलक्या घेताना दिसतो. झोप येणे अथवा घेणे ही माणसाची नैसर्गिक गरज आहे. मात्र ती पूर्ण करण्यासाठीच्या वेळा आणि जागा या माणसाने निश्चित केलेल्या आहेत. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना डुलकी घेणे म्हणजे त्या विषयाबद्दल आपल्याला गांभीर्य नाही असे दाखवून दिल्यासारखं आहे. राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भाजपाचे आमदार गिरीश महाजन यांच्या बाबतीत असाच काहीसा प्रकार आज विधानसभेत पाहायला मिळाला. बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर विधानसभेत चर्चा सुरू असताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस अतिशय आक्रमकपणे विरोधकांची भूमिका मांडत होते. फडणवीस तावातावाने बोलत असतानाच त्यांच्याच पाठी बसलेले भाजपचे नेते गिरीश महाजन ( Girish Mahajan Taken Nap in Session ) डुलकी घेत होते. त्यावेळी त्यांच्या शेजारी बसलेल्या आशिष शेलारांनी ( ashish shelar ) महाजन यांना हाताच्या कोपऱ्याने खुणावत झोपेतून जागे केले. त्यामुळे महाजन खडबडून जागे झाले आणि त्यांनीही फडणवीस यांच्या सुरात सूर मिसळला. महाजन डुलकी घेत असतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST