Nawab Malik Arrested : नवाब मलिकांच्या अटकेनंतर मोहित कंबोजचा तलवार नाचवून जल्लोष - मोहित कंबोज मराठी बातमी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14549525-thumbnail-3x2-mohit.jpg)
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडीने ) अटक केली ( Nawab Malik Arrested ) आहे. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर ईडीने ही अटकेची कारवाई केली आहे. त्यानंतर भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी तलवार काढून जल्लोष केला आहे. यावेळी मोहित कंबोज आणि कार्यकर्त्यांनी 'जय भवानी जय शिवाजी'च्या घोषणा दिल्या ( Mohit Kamboj With Sword ) आहेत. दरम्यान, काही दिवसांपुर्वी मोहित कंबोज यांनी नवाब मलिक हे अनिल देशमुखांसोबत जेलमध्ये डब्बा खाताना दिसतील, असे म्हटले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST