ETV Bharat / sukhibhava

World Sight Day 2023 : जागतिक दृष्टी दिन 2023; जाणून घ्या काय आहे इतिहास - history and significance

World Sight Day 2023 : डोळ्यांशी संबंधित वाढत्या आरोग्य समस्यांकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी आणि प्रतिबंधाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या गुरुवारी 'जागतिक दृष्टी दिन' साजरा केला जातो.

World Sight Day 2023
जागतिक दृष्टी दिन 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 11:04 AM IST

Updated : Oct 11, 2023, 11:14 AM IST

हैदराबाद : 'जागतिक दृष्टी दिन', दरवर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो, हा एक जागतिक पातळीवरील जनजागृती कार्यक्रम आहे. त्यामागे अंधत्व आणि दृष्टिदोषाकडे लोकांचे लक्ष वेधणं, असा उद्देश आहे. 2000 मध्ये लायन्स क्लब इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या साइट फर्स्ट मोहिमेद्वारे हा दिवस सुरू करण्यात आला होता. यावर्षी 12 ऑक्टोबर रोजी 'जागतिक दृष्टी दिन' साजरा केला जात आहे.

यावर्षीची थीम काय आहे? यावर्षी 'जागतिक दृष्टी दिना'ची थीम आहे, तुमच्या डोळ्यांवर प्रेम करा', कामाच्या ठिकाणी डोळ्यांच्या आरोग्याकडं लक्ष द्या. ही थीम आपल्या डोळ्यांच्या आरोग्याबद्दल जागरुकता करण्यासाठी आणि आपल्या दृष्टीची काळजी घेण्याच्या गरजेवर भर देते. या उद्देशासाठी आपण आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली पाहिजे. आपल्या ओळखीच्या इतरांनाही असे करण्यास प्रोत्साहित केलं पाहिजे.

'जागतिक दृष्टी दिना'चा इतिहास : सन 2000 मध्ये पहिल्यांदा 'जागतिक दृष्टी दिवस' साजरा करण्यात आला. 2005 मधील सहाव्या कार्यक्रमाची थीम होती 'राइट टू साईट'. तेव्हापासून दरवर्षी डोळ्यांचं आरोग्य आणि मुलांमधील दृष्टी समस्या आणि वृद्धांमध्ये दृष्टी कमी होणं यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी काही थीमसह साजरा केला जातो. गतवर्षी हॉप इन साईट ही जागतिक दृष्टी दिनाची थीम होती.

'जागतिक दृष्टी दिना'चं महत्त्व : आपले डोळे आपल्याला आपल्या आजूबाजूला पाहण्यात आणि आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक प्रमुख कार्य करण्यास मदत करतात. अशाप्रकारे दृष्टीचा आपल्या अस्तित्वावर आणि आपल्या जीवनाच्या गुणवत्तेवर थेट परिणाम होतो. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणं महत्त्वाचं असते.

हेही वाचा :

  1. World Mental Health Day 2023 : जगभरात एक अब्ज नागरिक मानसिक आजाराचे बळी; जाणून घ्या, मानसिक आरोग्य दिनाची संकल्पना
  2. International Day of Girl Child : आंतरराष्ट्रीय बालिका दिन 2023; जाणून घ्या का साजरा केला जातो हा खास दिवस
  3. World Smile Day 2023 : जागतिक स्मितहास्य दिनानिमित्त जाणून घ्या कसं ठेवावं स्वत:ला खूश...

Last Updated : Oct 11, 2023, 11:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.