ETV Bharat / sukhibhava

World Art Day 2023 : काय आहे जागतिक कला दिनाचा इतिहास, कोण होते लिओनार्दो दा विंची, जाणून घ्या सविस्तर

जागतिक कला दिवसाला तरुणांना कला जोपासण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते. जागतिक कीर्तीचे चित्रकार लिओनार्दो दा विंची यांच्या जन्मदिवशी जागतिक कला दिन साजरा करण्यात येतो.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Apr 15, 2023, 11:32 AM IST

हैदराबाद : कला हे जगण्याचे साधन असल्याने मानव हा कलेशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे कलेचा विकास करण्यासाठी विविध कलाकार सतत कार्यरत असतात. या कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक कला दिन 15 एप्रिलला साजरा करण्यात येतो. जागतिक दर्जाचे चित्रकार लिओनार्दो दा विंची यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जागतिक कला दिन साजरा करण्यात येतो. त्यामुळे काय आहे कला दिनाचा इतिहास, याबाबतची माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

कोण होते लिओनार्दो दा विंची : लिओनार्दो दा विंची यांचा जन्म इटलीतील विंची या गावात 15 एप्रिल 1452 मध्ये झाला होता. लिओनार्दो दा विंची महान चित्रकार होते. त्यांनी बनवलेल्या मूर्ती अप्रतिम होत्या, त्यामुळे ते मूर्तिकारही होते. वास्तुशिल्पी, संगीततज्ज्ञ आणि कुशल इंजिनिअरही होते. त्यामुळे लिओनार्दो दा विंची हे अल्पावधितच मोठे नावारुपाला आले होते. मात्र त्यासाठी त्यांना मोठे कष्ट घ्यावे लागले. विंची यांनी अतिशय कमी वयात आँद्रेआ देल वेरॉक्यो यांच्याकडे आपल्या कलेचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर विंची यांनी मिलानच्या दरबारात काम केले. येथेच त्यांनी लास्ट सफर ( अंतिम व्यालू ) हे जगप्रसिद्ध चित्र बनवले. मात्र 1499 मध्ये लुडोविकोच्या पतनानंतर विंची हे फ्लॉरेंसला परत आले. येथे त्यांनी मोनालिसाचे जगप्रसिद्ध चित्र बनवले. लिओनार्दो दा विंची यांनी काढलेले मोनालिसाचे चित्र आजही जगातील सर्वोत्तम चित्र मानले जाते.

काय आहे जागतिक कला दिनाचा इतिहास : लिओनार्दो दा विंची यांनी काढलेली चित्रे भाषण स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचे प्रतिक मानले जातात. त्यामुळे त्यांच्या कलेचा सन्मान करण्यासाठी युनेस्कोने UNESCO 2012 मध्ये जागतिक परिषदेत 15 एप्रिल हा जागतिक कला दिन घोषित केला. कलाप्रेमींच्या कलेला चालना देण्यासाठी दरवर्षी हा दिवस जागतिक कला दिन World Art Day 2023 म्हणून साजरा करण्यात येतो. विविध कलेच्या माध्यमातून नवसंकल्पना समाजात रुजवण्यात मोलाची भर पडते. त्यामुळे कलेची देवाण घेवाण होणे गरजेचे असते. कलेमुळे समाजाला चालना मिळते. त्यासाठी युनेस्कोने पुढाकार घेऊन 15 एप्रिल हा दिवस जागतिक कला दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे.

काय आहे जागतिक कला दिनाचे महत्व : कला ही समाजाला दिशादर्शक असते. त्यामुळे कलावंताना समाजात प्रतिष्ठा मिळते. जागतिक कला दिनाचे औचित्य साधून जगभरातील कलावंत एकत्र येतात. इंटरनॅशनल आर्ट असोसिएशन आणि युनेस्कोच्या वतीने हा दिवस संयुक्तपणे साजरा करण्यात येतो. युनेस्कोच्या वतीने कला जीवंत ठेवण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तरुणांना कलेची जोपासणा करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते. त्यामुळे जागतिक कला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

हेही वाचा - Sun In Aries : सूर्यदेव करणार संक्रमण, जाणून घ्या कोणत्या सात राशीवर होणार धनाचा वर्षाव, कोणत्या राशीला बसेल फटका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.