ETV Bharat / sukhibhava

Bihu Festival 2023 : का साजरा करण्यात येतो बिहू; काय आहे परंपरा, जाणून घ्या सविस्तर माहिती - रोंगली बिहू

बिहू हा सण ईशान्येकडील राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. बहू या सणाचे तीन प्रकार असून यावेळी बोहाग बिहू हा सण साजरा करण्यात येतो. या सणापासून पिकाची कापणी सुरू होते.

Bihu Festival 2023
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Apr 14, 2023, 11:50 AM IST

हैदराबाद : बिहू हा सण आसाममध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. आसाम राज्यात बिहू सण वर्षातून तीन वेळा साजरा करण्यात येतो. हा कोणत्याही धर्माचा सण नसूनही खूप मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याने या सणाची भूरळ देशभरातील नागरिकांना लागून असते. त्यामुळे बिहू कसा साजरा करतात, याबाबतची माहिती आपण जाणून घेऊ या खास लेखातून.

काय आहे बिहूचा इतिहास : बिहू हा सण बिशू या शब्दापासून बनला आहे. बिशूचा अर्थ शांती असा होतो. त्यामुळे सगळे नागरिक एकत्र येऊन भोग म्हणजे भोजन करतात. सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी नागरिक एकत्र येऊन शेतातील पिकाची कापणी करुन एकत्र पारंपरिक पद्धतीने भोजन करतात. त्यामुळे या सणाची सुरुवात इसपू 3500 पासून सुरू असल्याचे दिसून येते. यातील बि म्हणजे विचारणे आणि शू म्हणजे पृथ्वीची शांती आणि समृद्धी असा अर्थ काढण्यात येतो. बिहू हा शब्द दिमासा नागरिकांच्या भाषेतून घेतलेला आहे. दिमासा नागरिकांची देवता ब्राई शिबराई आणि पिता शिबराई असल्याचे हे नागरिक मानतात. त्यामुळे बिहू हा सण शेतीशी निगडीत असलेल्या परंपरेवर आधारित असल्याचे दिसून येते.

बिहू सणाचे महत्व : ईशान्येकडील राज्यात बिहू हा सण साजरा करण्यात येतो. या सणाला तरुण आणि तरुणी मोठ्या प्रमाणात पारंपरिक नृत्यू सादर करतात. आसाममध्ये बिहू वर्षातून तीन वेळा साजरा करतात. यात माघी बिहू, रोंगली बिहू आणि बोहाग बिहू असे या बिहू सण साजरा करण्याचे प्रकार आहेत. त्यातील बोहाग बिहू हा सण एप्रिलमध्ये साजरा करण्यात येतो. बोहाग बिहूपासून आसामच्या नववर्षाला सुरूवात होते. त्यासह शेतात आलेल्या पिकाची या दिवसापासून कापणी सुरू करण्यात येते. त्यामुळे हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. विशेष म्हणजे हा धार्मीक सण नसून ईशान्येकडील सगळ्याच राज्यात तो साजरा करण्यात येतो. या सणाला शेतात काम करणाऱ्यांसह विविध समाजात बिहू साजरा करण्यात येतो.

बिहू सणाची परंपरा : आसाममध्ये साजरा करण्यात येणाऱ्या बहुप्रतिक्षित बोहाग बिहू सण साजरा करण्यात येत आहे. या सणाला आसामी नवीन वर्षाची सुरुवात होते. त्यासह आसामच्या नागरिकांच्या वतीने 7 दिवसांचा कापणी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या बिहूला रोंगाली बिहू म्हणूनही ओळखले जाते. या उत्सवांमध्ये विविध सांस्कृतिक, लोकनृत्य, बिहू गाणी, हिंदू चंद्र सौर कॅलेंडरची सुरूवात या दिवसापासून सुरू होते. त्यामुळे ईशान्येकडील नागरिक पारंपरिक पद्धतीने वेश परिधान करुन शेतात कापणी करतात. यावेळी तरुण तरुणी पारंपरिक नृत्य सादर करतात. ढोल, पेपा वाजवण्यात येते. त्यामुळे

हेही वाचा - Akshaya Tritiya 2023 : साडेतीन मुहुर्तापैकी अक्षय तृतीया आहे महत्वाचा मुहुर्त, जाणून घ्या अक्षय तृतीयाचा इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.