हैदराबाद - जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणुचा प्रसार पहायला मिळत आहे. या प्रसारात डोळ्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली असू शकते. कोरोना विषाणुच्या प्रसाराचा मुख्य मार्ग तोंडावाटे किंवा नाकावाटे आहे. जो श्लेष्मल त्वचा किंवा म्युकस मेंब्रेनच्या रेषेत आहे. डोळ्यांवाटे कोरोनाचा प्रसार झाल्याचे सिद्धही झाले आहे. ईटीव्ही भारत सुखीभवाने नेत्ररोगशास्त्र डॉ. निखिल एम. कामत(एम.बी.बी.एस., एम.एस.) यांच्याशी चर्चा केली. डॉ.कामत हे पुणे येथील एच व्ही देसाई नेत्र रूग्णालयाचे फेलो असून मारगाव येथील मदर केअर हॉस्पिटलमध्ये या विषयात अधिक ज्ञान संपादन करण्यासाठीही नेत्ररोगतज्ञ म्हणून काम करतात.
कसा होतो प्रसार?
जेव्हा कोरोना विषाणुचा संसर्ग झालेली एखादी व्यक्ति खोकते, शिंकते किंवा बोलते, तेव्हा त्याच्या तोंडातून किंवा नाकावाटे विषाणुचे कण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर उडू शकतात. हे अत्यंत सूक्ष्म असे तुषार तुमच्या तोंडावाटे किंवा नाकावाटे श्वासातून आत ओढून घेण्य़ाची शक्यता असते. परंतु हे तुषार तुमच्या डोळ्यांवाटेही शरिरात शिरू शकतात. दुसरी संपर्क होण्याचा शक्य असलेला मार्ग म्हणजे तुम्ही विषाणु असलेली दाराची कडी, टेबल किंवा दूषित मास्कला हाताने स्पर्श केला आणि त्याच हातांचा स्पर्श डोळ्यांना केला तरीही, तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. जगभरातील आरोग्य अधिकाऱ्यांच्या अनुसार, कोरोना विषाणु १ ते ३ टक्के लोकांमध्ये डोळ्यांचा होणारा दाह (लाल डोळे) होण्यास कारण ठरू शकतो.
असा टाळाता येईल प्रसार -
डोळ्यांवाटे विषाणुचा प्रसार होण्यावर मर्यादा घालण्यासाठी, दररोजच्या काही सवयींमध्ये बदल घडवून आणावा लागेल. जसे की डोळे चोळण्याची सवय बदलावी लागेल. जर डोळ्यांना खाज सुटली असेल किंवा डोळे चोळण्याची आत्यंतिक गरज भासत असेल किंवा अगदी चष्म्याच्या काचाही नीट करायच्या असतील तर, तुमच्या बोटांऐवजी टिश्यू पेपरचा किंवा कपड्याचा वापर केला पाहिजे. कोरडे डोळे अधिक जोराने चोळावे वाटतात. त्यासाठी लुब्रिकेटिंग द्रवाचे थेंबांचा वारंवार वापर करणे योग्य राहील. त्यापूर्वी अर्थातच वीस सेकंद तुम्ही तुमचे हात साबण आणि पाण्याने योग्य प्रकारे धुतलेले पाहिजेत. सातत्याने हात धुणे आणि सॅनिटायझेशनमुळे संसर्गाचा धोका कमी होण्यास निश्चितच मदत होते. खाण्यापूर्वी, स्वच्छतागृहात जाऊन आल्यानंतर, शिंकल्यावर, खोकल्यावर किंवा नाक स्वच्छ केल्यावर तुमचे हात तुम्ही धुतले पाहिजेत. तसेच, नियमितपणे चेहऱ्याला हात लावणे टाळले पाहिजे. असे निरिक्षणात आले आहे की जे लोक कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरतात, त्यांची आपल्या डोळ्यांना हात लावण्याकडे इतरांपेक्षा जास्त प्रवृत्ती असते. कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या ऐवजी चष्मा वापरल्याने डोळ्यांची चुरचुर कमी होऊन डोळ्यांना हात लावण्यापूर्वी तुम्हाला थांबणे भाग पडते. तुम्ही जर रूग्णाची किंवा संसर्ग झालेल्या व्यक्तिची सेवा करणारे आरोग्य कर्मचारी असाल तर चष्मा वापरल्याने अतिरिक्त संरक्षण मिळते. मात्र, बहुतेक संसर्ग हा नाकावाटे आणि श्वसन यंत्रणेतून होत असल्याने चष्मा सक्तीने घालण्याची सूचना करण्याएवढी पुरेशी आकडेवारी उपलब्ध नाही